Header Marque

नमस्कार! या ब्लॉगवर मी माझ्या आयुष्यातील कथा, अनुभव आणि शिकलेले धडे तसेच उपयुक्त माहिती तुम्हाला नियमितपणे शेअर करणार आहे.

Sunday, 22 January 2017

नको ना आई नको मारू मला..!!! (आईच्या गर्भातून मुलीची आई ला विनवणी)

नको ना आई नको मारू मला..!!! 



नको ना आई नको मारू मला
या सर्वात जीव जाणारच माझा ऐकून किती वाईट वाटतेय
आई मला कळतंय किती त्रास होतोय तुला
नको ना आई नको मारू मला..!!!

उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार
मी मुलगी आहे हे सर्वाना कळणार
मी तुझ्याच रक्ताचा आहे गोळा हे कळू दे तुला
नको ना आई नको मारू मला..!!!

माझ्या डोळ्यांनी हे सुंदर जग बघण्याची ईच्छा होतेय मला
ते फुल, त्या गाड्या, ते घर अन तो मळा
तुझ्या कडूनच घोटला जाणार का मजा गळा
नको ना आई नको मारू मला..!!!

दादाचे जुने ड्रेसच वापरायला देजो मला
नको नवीन कंगन, पैंजण अन चप्पल मला
घरातही तुझ्या कामात मदत करेल मी तुला
नको ना आई नको मारू मला..!!!

आई बघ ना तुला ऑपेरेशन थेअटर मध्ये नेताय
बघ ना डॉक्टर अन नर्स पण सोबत येताय
ती कैची अन कटर बघून भीती वाटू लागलीय मला
नको ना आई नको मारू मला..!!!

आई बघ आता माझे हात कापताय
बघ आता माझे पाय कापताय
थोडी हिम्मत केली असती आई तू तर बघू शकली असतीस मला
तू स्वतः मारलाय तुझ्या पोटचा गोळा  
नको ना आई नको मारू मला..!!! नको ना आई नको मारू मला..!!! नको ना आई नको मारू मला..!!!

कविता लेखन
निखिल श्रीकांत मोराणकर
(२२ जानेवारी २०१७)

Tuesday, 27 December 2016

माझ्या भारताचं राजकारण...!!!



सत्तेचा लोभ कि लोभाची सत्ता 
धनाची सत्ता कि सत्तेचं धन 
अरे आज काल नाही लागत आमचे मन 
कारण, कुठे नेऊन ठेवलय माझ्या भारताचं राजकारण 

कोणी देशाच्या भल्यासाठी जुन्या नोटा बंद करतय 
तर कोणी त्याला विरोध करतंय
नेमक समजत नाही कोणाकोणाकडे आहे काळे धन  
कारण, कुठे नेऊन ठेवलय माझ्या भारताचं राजकारण

कोणी बेटी बचाओ, बेटी पढाओ चा नारा देताय 
तर काही नराधम आयाबहिणींची अब्रू लुटताय 
असे शर्मनाक कृत्य करताना नाही घाबरत का त्यांचे मन 
कारण, कुठे नेऊन ठेवलय माझ्या भारताचं राजकारण

कोणी देशाच्या सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राईक चे पुरावे मागताय 
तेच लोक तेवढ्याच महत्त्वाकांक्षेने पार्टी फंट जमा करताय 
हे सर्व विसरलेले दिसताय कारगिल युद्धाचे क्षण 
कारण, कुठे नेऊन ठेवलय माझ्या भारताचं राजकारण

कोणी चाऱ्याचे पैसे खाताय तर कोणी विमानाचे 
तर कोणी नकली नोटा छापून देशाची गद्दारी करताय 
भ्रष्टाचार करून देशाच वाटोळं करताना घाबरत नाही का यांचं मन 
कारण, कुठे नेऊन ठेवलय माझ्या भारताचं राजकारण

कवी:- निखिल श्रीकांत मोराणकर, पुणे

कळी... उमलण्यापूर्वी तुटणाऱ्या कळीची (मुलीची) आपल्या आईला विनवणी


कळीचे फूल होवू देण्याची काळजी घे आई
उमलण्या आधी खुडायची करू नको घाई

उमलून  घ्यावा श्वास  असच वाटतं मला
पडछाया मी तुझीच हे ठाऊक  आहे तुला

जगायचा हक्क माझा का नाकारतेस आई
उमलण्या आधीच खुडायची नको ना घाई ||१||

तुझ्याच रक्तमासाचाच मी गोळा आहे जसा
कठोर होऊन तू निर्णय घेऊ नको असा 

वंशवेल वाढविते नको जाऊ विसरून     
निष्पाप जीव हत्या मानवतेला कलंकून

मुलगा-मुलगीत काही भेद नसतो आई
उमलण्या आधीच खुडायची नको ना घाई ||२||

देईल खूप प्रेम काळजी वाहील सत्वर
साह्य करण्या तुला तयार असेल तत्पर

मुलगी म्हणून कुठे पडणार नाही कमी
डगमगणार नाही कधी ठेव याची हमी

निसर्गाचा समतोल राखावा लागतो आई
उमलण्या आधीच खुडायची नको ना घाई ||३||

शिक्षणाचाही माझ्या कधी देणार नाही त्रास
चांगल्या गुणांनीच  मी नेहमी होईल पास

सुनिता, सायना, किरण असे आदर्श माझे
उर भरे अभिमाने हे पांग फेडील तुझे

सुंदर जग पाहण्याच अप्रुप मला आई
उमलण्या आधी नको कळी खुडायची घाई ||४||

कवी:- संगीता नंदकुमार शिरोडे, पुणे 

Thursday, 29 September 2016

देख मेरे भाई पाकिस्तान, बोल रहा हैं हिंदुस्थान.!!!


मत कर चुगली तू हम पर अब, मत फेक तू हमपर बारुद और बाम।
हम अब नहीं रहेंगे चूप, मिंटा देंगे तेरे दुनिया से निशान।।

पठाणकोट, उरी हमाले करावे के तुझे कूच नहि होगा हासील ना मिलेगा कोई अंजाम।
शायद तू भूल गया हैं कारगिल का महासंग्राम।।

तुने बहोत किये हमले, तुने निर्दोशो को मारा हैं।
मत भुलना सिंधू जलधारा भी हमारा हैं।।

२६/११ हम भुले नहीं, ना भुलेंगे हम अब उरी।
३८ अभी बस ट्रेलर मैं मारे हैं, Picture अभी बाकी हैं पुरी।।

हमने दिखाई हर वक्त समझदारी, तुने हर वक्त दिया हैं हमें धोका।
अब तू आवाज तो उठाके दिखा, हम अब नई छोडेंगे कोई मौका।।

गरज उठा हैं हिंदुस्थान, अब भारतीय सैनिक तुझे तेरी औकात दिखायेंगे।
अब बस युद्ध का शंख बज जाये, पाकिस्तान वालो तूम युद्ध करना भूल जावोगे।।

ठीक से अगर रहेगा, तोही तुझे मिलेगा सम्मान।
वरना निकाल लेंगे तेरी हम जान।।

देख मेरे भाई पाकिस्तान, बोल रहा हैं हिंदुस्थान !!!  

कविता लेखन :
निखिल मोराणकर (३० Sept २०१६)

Friday, 2 September 2016

नवीन येणारी पिढी व भारतीय सण...!!!

नमस्कार, आत्ताच आपण पूर्ण जल्लोषात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली. कोण म्हणतय कि दहीहंडी ची उंची कमी करा कोणच काय तर कोणाचं काय? पण खरंच आपण दहीहंडी व सर्व सण आनंदाने साजरी करतोय पण त्या सणांमागचा उद्देश आपण समजून घेतोय का? कि फक्त राजकारण, धिंगाणा, मज्जेसाठी हे सर्व आपण करतोय?...
आजच्या संगणकीय युगात सर्व जण आपल्या आपल्या आयुष्यात व्यस्त झालाय नक्कीच हे सण प्रत्येकाला एक निवांत करणारा अनुभव देऊन जातो पण आपण या आपल्या सणांमागचे गांभीर्य जाणून घेणे गरजेचे आहे. मज्जा मस्ती सर्वानी करायला हवीच परंतु त्या सणांमागचे हेतू जाणून त्या सर्वांची माहिती आपण आपल्या नवीन पिढीला समजावून सांगितले पाहिजे, आपण पण जगासोबत बदलने गरजेचे आहे. आपली भारतीय संस्कृती हि एक अभेद्य व जगाला जीवनाची शिकवण देणारी संस्कृती आहे, आणि आपली नवीन पिढी मध्ये ती जपून राहणे तेव्हडेच गरजेचे आहे. आजचे मुल मैदानी खेळ सुद्धा विसरून चाललेले ते आता मोबाईल व संगणकाकडे जास्त आकर्षक होऊ लागतंय त्याचे कारण पण आपणच आहोत. आता तुम्ही म्हणाल खेळ व सणांचा संबंध काय? तर नक्कीच आहे, हिंदू संस्कृती मधील प्रत्येॅक सण हा कोणत्या तरी खेळाला जोडला गेलाय जसे कि दहीहंडी हा एक धाडसी खेळाचाच प्रकार आहे. त्या सर्व गोष्टी या नवीन पिढीला देणे गरजेचे आहे.

कालच शेतकरी राजाच्या साथीदार म्हणजेच बैल व त्याचा सण म्हणजेच पोळा आपण साजरा केला. अहो, पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरातील २२ वर्षाच्या मराठी तरुणाला त्याची माहिती नव्हती हे कितपत योग्य आहे. आजचा तरुण असा असेल तर भावी १० वर्षांनी तरुणांना हे सांगावे लागेल कि पोळा हा सण साजरा केला जायचा. हि लोप पावत चाललेली आपली संस्कृती आपण जपणे व तिचा प्रसार करणे खूप महत्वाचे झालेय. श्रीकृष्ण भगवंतांच्या लीला आपल्या सर्वाना तर माहीतच आहे, तसेच आपली भावी पिढी हुशारी सोबत चंचल पण असायला हवी. मग आपण ह्या गोष्टी कशा अमलात आणायला हव्या तर या साठी आपल्याला काही वेगळं करायचे नाही तर आपल्या घरच्या लहाल मुलांना व जमल्यास आपल्या कॉलोनी किंवा गल्लीतली मुलांना आपण हफ्त्यातून किंवा पंधरा दिवसातून घेऊन बसले पाहिजे त्यांना आपल्या धर्म, संस्कृती व सणांबद्दल माहिती दिली पाहिजे. तसेच त्यांना आपण मैदानी खेळांचं महत्व समजावून देणे गरजेचे आहे, त्यांना मैदानी खेळांकडे आकर्षित केले पाहिजे. तसेच समाजाच्या प्रती असलेले आपले कर्तव्य त्यांना आपण समजावून सांगायला हवे.

आता सध्या ज्या बलात्काराच्या घटना अतिशय दुर्दैवीरित्या घडताय त्या फक्त त्या आरोपींच्या प्रति असलेल्या संस्काराच्या कमतरतेमुळे होताय, ह्या घटना चुकीच्या आहेत हे त्यांना सांगणे पण तेवढेच गरजेचे आहे. श्रीकृष्ण, अर्जुन, कर्ण, राम, महाभारत, रामायण सर्व ग्रंथांबद्दल माहिती त्यांच्या पर्यंत पोहोचव्हायला हवी. कारण आपल्या भावी पिढी हि आपली संस्कृती जपणारी हवी. त्यासाठी  आपण त्यांना आपल्या संस्कृतीची ओळख करून दिली पाहिजेच.

आमच्या एका बघिणीं डॉ. सौ.संगीता नंदकुमार शिरोडे यांनी एक कविता याच विषयाला अनुसरून लिहिली आणि खूप छान प्रकारे मांडलीय भगवान श्रीकृष्णला परत येण्याची विनवणी करणारे हे काव्य आपल्या साठी येथे त्यांची परवानगी घेऊन येथे लिहितोय

परत पुन्हा....

घ्यावा लागेल जन्म तुला आज परत कान्हा
प्रबोधन करण्याची वेळ आली आहे पुन्हा

गल्लोगल्ली कामासक्त  दुर्योधन, दुःशासन
यावं लागेल तुला करण्या त्यांचं निर्दालन

द्रौपदीची राखावी लागेल आज पुन्हा  लाज
कृष्णा तुला यावं लागेल परत पुन्हा आज||

अराजकता, अधर्माचं वाढलय पुन्हा स्तोम
अन्याय ,अत्याचाराचा वाढलाय खूप जोम

आसक्ती, मत्सर याचाच वाढलाय प्रभाव
निष्कामकर्म , वैराग्य याचाच आहे अभाव

ढोंगी कपटी लोकांची काढण्यास खरी लाज
कृष्णा तुला यावं लागेल परत पुन्हा आज||

सत्यासाठीच होती तुझीच सर्व चळवळ
स्वकियांविरूद्ध लढायचं दिल तूच बळ

गर्भगळीत अर्जुनाला दिली खूप हिंमत
जाणीव करून दिलीस  कल्याणाची किंमत

मानवतेच्या धर्माचीच पुन्हा राखण्या   लाज
कृष्णा तुला यावं लागेल परत पुन्हा आज||

(सोळाक्षरी )

धन्यवाद!!!

Friday, 19 August 2016

व्वा!!! सिंधू तू वाढवलीस ग भारताची शान...!!!

तमाम भारतवासीयांना क्रिकेट शिवाय दुसऱ्या खेळाचा सामना बघण्यास प्रवृत्त करणारी, रिओ ऑलिम्पिक मध्ये महिला बॅडमेंटन मध्ये भारताला सिल्वर मेडल मिळवून दिल्याबद्दल P. V. Sindhu चे खूप खूप अभिनंदन.!!!

 सिंधू साठी एक कविता लिहण्याचा मी प्रयत्न करतोय, तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा

 व्वा!!! सिंधू तू वाढवलीस ग भारताची शान  . 

भारताची तू शान आहेस ग सिंधू,
आपल्या पराक्रमाने झालीस तू संपूर्ण भारतवासीयांची केंद्र बिंदू.

बॅडमेंटन खेळाचा जपलास तू तुझा छंद,
तुझे हे यश सर्वाना देऊन गेले आनंद.

तू जिंकलीस आज १२५ करोड भारतवासीयांचे मन,
आणि Google Search मध्ये सुद्धा झालीस नंबर वन.

रौप्य पदक आलेस तरी काय झाले,
तू आहेसच ना भारताची सुवर्णकन्या.

तुझ्या निम्मिताने भ्रूणहत्या करणार्यांना जाग येवो,
आणि हा दैत्यांचा विचार कोणाच्याही डोक्यात न येवो.

अभिमानाने तुझ्या झाली भारताची ताठ मान
व्वा!!! सिंधू तू वाढवलीस ग भारताची शान...!!!

सिंधू व सर्व भारतीयांना खूप खूप अभिनंदन.!!!


Wednesday, 17 August 2016

स्वच्छता: आपली एक नैतिक जबाबदारी

भारताचे माजी राष्ट्रपती, अग्नी चे जनक, थोर शाश्रज्ञ, शिक्षक अबुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम (A. P. J. Abdul Kalam), आपल्या सर्वांना सोडून स्वर्गवासी झाले. कलाम सरांनी एक स्वप्न बघितलंय जे आपण सर्वजण जाणतो ते म्हणजेच "vision २०२०".

१२५ करोड जनतेचा आपला देश, सर्वात जास्त युवा असलेला देश, आज कलाम सर आपल्या सर्वांवर एक मोठी जबाबदारी देऊन गेलेत. आपला देश स्वातंत्र्य झाल्या पासून बराचसा बदल आपल्या देशाच्या प्रगती मध्ये झालाय. भरपूर क्षेत्रात भारतीय महत्वाची भूमिका बजावीत आहेत. अगदि IT पासून NASA  पर्यंत. आत्ताच २ वर्षांपूर्वी भारताने आपले यान मंगल ग्रहावर अतिशय कमी खर्चामध्ये पाठवून सर्व जगाला आश्चर्याचा धक्का दिला.

अशा खूप साऱ्या गोष्टींवर आपले प्रभुत्व आपण सिद्ध केलय, परंतु फक्त एवढी गोष्ट कलाम सरांच स्वप्न नाही. व्हिसिओन २०२० आता फक्त कलाम सरांचच नव्हे तर संपूर्ण भारताच स्वप्न आहे. आणि आपल्याला प्रत्येकाला आपल्या परीने यात योगदान देणं गरजेचे आहे.

कोणत्याही गोष्टीची सुरवात हि लहान गोष्टीपासून होत असते, जसे कि घराचे बांधकाम करताना पाया पक्का हवा. तसाच राष्ट्राच्या प्रगती साठी आपली स्वतःची प्रगती होणे खूप गरजेचे आहे.
खूप लहान लहान गोष्टी असतात कि ज्या आपण व्ययक्तीत करू शकतो जसे कि आपला परिसर स्वच्छ ठेवणे, रस्त्यावर किंवा कोठेही न थुंकणे, शौचास उघड्यावर न बसणे. आता लगेच आपल्या समोर प्रश्न उभा राहतो कि माझ्या एकट्यामुळे कुठे घाण होणारे, परंतु आपण आपल्या सारखा विचार करणारे किती जण आहेत याचा विचार केला पाहिजे, आज तुम्ही या सर्वांची काळजी घेशील कि माझ्या कडून कचरा होणार नाही, रस्ता मी खराब करणार नाही, मी कोठेही थुंकणार नाही. इ.

आज एक जण करेल त्याच बघून त्याच्या परिवार करेल, परिवाराचं बघून आजूबाजूचे करतील, न मग असं करत पुढे संपूर्ण गल्ली/कॉलनी व नंतर गाव. नेहमी सुरुवात एकापासूनच होत असते, परत आपल्या मनात प्रश्न उभा राहतो कि सर्वानी केलाच नाही फक्त आपणच करतो, तर हो सुरुवातीला आपल्याला असं वाटेल. परंतु एक थोड्या काळानंतर जेव्हा सर्वजण हि गोष्ट अंगीकारतील तेव्हा सर्वात जास्त आनंद तुम्हाला होईल कारण सुरुवात आपण केलेली होती.

सुरुवात कोणी दुसरा जरी करतो तर आपण या गोष्टी अंगिकारायला हव्या, कारण जर आपला परिसर स्वच्छ राहील तरच आपले आरोग्य चांगलं राहील,  रोगराई आपल्या पासून दूर राहील, आपण निरोगी राहू, जर आपण निरोगी राहू तर आपले दैनंदिन कार्य आपण अधिक ऊर्जेने करू शकतो. जेवढे चांगलं काम करू तेवढेच जास्त आपण आपली आर्थिक परिस्थिती सुधारू शकू. आणि आपली उन्नती हीच आपल्या राष्ट्राची उन्नती असते.

लक्षात असू दया,


स्वच्छता हि आपली एक नैतिक जबाबदारी आहे.!!!

आपला परिसर स्वच्छ ठेवा, आणि निरोगी राहा.!!!

रस्त्यावर थुंकू नका व कोणाला थुंकू देऊ नका.!!!

आपण निरोगी राहू तरच आपले राष्ट्र प्रगती करू शकेल.
धन्यवाद...!!!

-निखिल मोराणकर
Email: nikhilmorankar00@gmail.com