Header Marque

नमस्कार! या ब्लॉगवर मी माझ्या आयुष्यातील कथा, अनुभव आणि शिकलेले धडे तसेच उपयुक्त माहिती तुम्हाला नियमितपणे शेअर करणार आहे.

Sunday, 22 January 2017

नको ना आई नको मारू मला..!!! (आईच्या गर्भातून मुलीची आई ला विनवणी)

नको ना आई नको मारू मला..!!! 



नको ना आई नको मारू मला
या सर्वात जीव जाणारच माझा ऐकून किती वाईट वाटतेय
आई मला कळतंय किती त्रास होतोय तुला
नको ना आई नको मारू मला..!!!

उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार
मी मुलगी आहे हे सर्वाना कळणार
मी तुझ्याच रक्ताचा आहे गोळा हे कळू दे तुला
नको ना आई नको मारू मला..!!!

माझ्या डोळ्यांनी हे सुंदर जग बघण्याची ईच्छा होतेय मला
ते फुल, त्या गाड्या, ते घर अन तो मळा
तुझ्या कडूनच घोटला जाणार का मजा गळा
नको ना आई नको मारू मला..!!!

दादाचे जुने ड्रेसच वापरायला देजो मला
नको नवीन कंगन, पैंजण अन चप्पल मला
घरातही तुझ्या कामात मदत करेल मी तुला
नको ना आई नको मारू मला..!!!

आई बघ ना तुला ऑपेरेशन थेअटर मध्ये नेताय
बघ ना डॉक्टर अन नर्स पण सोबत येताय
ती कैची अन कटर बघून भीती वाटू लागलीय मला
नको ना आई नको मारू मला..!!!

आई बघ आता माझे हात कापताय
बघ आता माझे पाय कापताय
थोडी हिम्मत केली असती आई तू तर बघू शकली असतीस मला
तू स्वतः मारलाय तुझ्या पोटचा गोळा  
नको ना आई नको मारू मला..!!! नको ना आई नको मारू मला..!!! नको ना आई नको मारू मला..!!!

कविता लेखन
निखिल श्रीकांत मोराणकर
(२२ जानेवारी २०१७)