Header Marque

नमस्कार! या ब्लॉगवर मी माझ्या आयुष्यातील कथा, अनुभव आणि शिकलेले धडे तसेच उपयुक्त माहिती तुम्हाला नियमितपणे शेअर करणार आहे.

Tuesday, 27 December 2016

माझ्या भारताचं राजकारण...!!!



सत्तेचा लोभ कि लोभाची सत्ता 
धनाची सत्ता कि सत्तेचं धन 
अरे आज काल नाही लागत आमचे मन 
कारण, कुठे नेऊन ठेवलय माझ्या भारताचं राजकारण 

कोणी देशाच्या भल्यासाठी जुन्या नोटा बंद करतय 
तर कोणी त्याला विरोध करतंय
नेमक समजत नाही कोणाकोणाकडे आहे काळे धन  
कारण, कुठे नेऊन ठेवलय माझ्या भारताचं राजकारण

कोणी बेटी बचाओ, बेटी पढाओ चा नारा देताय 
तर काही नराधम आयाबहिणींची अब्रू लुटताय 
असे शर्मनाक कृत्य करताना नाही घाबरत का त्यांचे मन 
कारण, कुठे नेऊन ठेवलय माझ्या भारताचं राजकारण

कोणी देशाच्या सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राईक चे पुरावे मागताय 
तेच लोक तेवढ्याच महत्त्वाकांक्षेने पार्टी फंट जमा करताय 
हे सर्व विसरलेले दिसताय कारगिल युद्धाचे क्षण 
कारण, कुठे नेऊन ठेवलय माझ्या भारताचं राजकारण

कोणी चाऱ्याचे पैसे खाताय तर कोणी विमानाचे 
तर कोणी नकली नोटा छापून देशाची गद्दारी करताय 
भ्रष्टाचार करून देशाच वाटोळं करताना घाबरत नाही का यांचं मन 
कारण, कुठे नेऊन ठेवलय माझ्या भारताचं राजकारण

कवी:- निखिल श्रीकांत मोराणकर, पुणे

कळी... उमलण्यापूर्वी तुटणाऱ्या कळीची (मुलीची) आपल्या आईला विनवणी


कळीचे फूल होवू देण्याची काळजी घे आई
उमलण्या आधी खुडायची करू नको घाई

उमलून  घ्यावा श्वास  असच वाटतं मला
पडछाया मी तुझीच हे ठाऊक  आहे तुला

जगायचा हक्क माझा का नाकारतेस आई
उमलण्या आधीच खुडायची नको ना घाई ||१||

तुझ्याच रक्तमासाचाच मी गोळा आहे जसा
कठोर होऊन तू निर्णय घेऊ नको असा 

वंशवेल वाढविते नको जाऊ विसरून     
निष्पाप जीव हत्या मानवतेला कलंकून

मुलगा-मुलगीत काही भेद नसतो आई
उमलण्या आधीच खुडायची नको ना घाई ||२||

देईल खूप प्रेम काळजी वाहील सत्वर
साह्य करण्या तुला तयार असेल तत्पर

मुलगी म्हणून कुठे पडणार नाही कमी
डगमगणार नाही कधी ठेव याची हमी

निसर्गाचा समतोल राखावा लागतो आई
उमलण्या आधीच खुडायची नको ना घाई ||३||

शिक्षणाचाही माझ्या कधी देणार नाही त्रास
चांगल्या गुणांनीच  मी नेहमी होईल पास

सुनिता, सायना, किरण असे आदर्श माझे
उर भरे अभिमाने हे पांग फेडील तुझे

सुंदर जग पाहण्याच अप्रुप मला आई
उमलण्या आधी नको कळी खुडायची घाई ||४||

कवी:- संगीता नंदकुमार शिरोडे, पुणे