नमस्कार, आत्ताच आपण पूर्ण जल्लोषात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली. कोण म्हणतय कि दहीहंडी ची उंची कमी करा कोणच काय तर कोणाचं काय? पण खरंच आपण दहीहंडी व सर्व सण आनंदाने साजरी करतोय पण त्या सणांमागचा उद्देश आपण समजून घेतोय का? कि फक्त राजकारण, धिंगाणा, मज्जेसाठी हे सर्व आपण करतोय?...

आजच्या संगणकीय युगात सर्व जण आपल्या आपल्या आयुष्यात व्यस्त झालाय नक्कीच हे सण प्रत्येकाला एक निवांत करणारा अनुभव देऊन जातो पण आपण या आपल्या सणांमागचे गांभीर्य जाणून घेणे गरजेचे आहे. मज्जा मस्ती सर्वानी करायला हवीच परंतु त्या सणांमागचे हेतू जाणून त्या सर्वांची माहिती आपण आपल्या नवीन पिढीला समजावून सांगितले पाहिजे, आपण पण जगासोबत बदलने गरजेचे आहे. आपली भारतीय संस्कृती हि एक अभेद्य व जगाला जीवनाची शिकवण देणारी संस्कृती आहे, आणि आपली नवीन पिढी मध्ये ती जपून राहणे तेव्हडेच गरजेचे आहे. आजचे मुल मैदानी खेळ सुद्धा विसरून चाललेले ते आता मोबाईल व संगणकाकडे जास्त आकर्षक होऊ लागतंय त्याचे कारण पण आपणच आहोत. आता तुम्ही म्हणाल खेळ व सणांचा संबंध काय? तर नक्कीच आहे, हिंदू संस्कृती मधील प्रत्येॅक सण हा कोणत्या तरी खेळाला जोडला गेलाय जसे कि दहीहंडी हा एक धाडसी खेळाचाच प्रकार आहे. त्या सर्व गोष्टी या नवीन पिढीला देणे गरजेचे आहे.
कालच शेतकरी राजाच्या साथीदार म्हणजेच बैल व त्याचा सण म्हणजेच पोळा आपण साजरा केला. अहो, पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरातील २२ वर्षाच्या मराठी तरुणाला त्याची माहिती नव्हती हे कितपत योग्य आहे. आजचा तरुण असा असेल तर भावी १० वर्षांनी तरुणांना हे सांगावे लागेल कि पोळा हा सण साजरा केला जायचा. हि लोप पावत चाललेली आपली संस्कृती आपण जपणे व तिचा प्रसार करणे खूप महत्वाचे झालेय. श्रीकृष्ण भगवंतांच्या लीला आपल्या सर्वाना तर माहीतच आहे, तसेच आपली भावी पिढी हुशारी सोबत चंचल पण असायला हवी. मग आपण ह्या गोष्टी कशा अमलात आणायला हव्या तर या साठी आपल्याला काही वेगळं करायचे नाही तर आपल्या घरच्या लहाल मुलांना व जमल्यास आपल्या कॉलोनी किंवा गल्लीतली मुलांना आपण हफ्त्यातून किंवा पंधरा दिवसातून घेऊन बसले पाहिजे त्यांना आपल्या धर्म, संस्कृती व सणांबद्दल माहिती दिली पाहिजे. तसेच त्यांना आपण मैदानी खेळांचं महत्व समजावून देणे गरजेचे आहे, त्यांना मैदानी खेळांकडे आकर्षित केले पाहिजे. तसेच समाजाच्या प्रती असलेले आपले कर्तव्य त्यांना आपण समजावून सांगायला हवे.
आता सध्या ज्या बलात्काराच्या घटना अतिशय दुर्दैवीरित्या घडताय त्या फक्त त्या आरोपींच्या प्रति असलेल्या संस्काराच्या कमतरतेमुळे होताय, ह्या घटना चुकीच्या आहेत हे त्यांना सांगणे पण तेवढेच गरजेचे आहे. श्रीकृष्ण, अर्जुन, कर्ण, राम, महाभारत, रामायण सर्व ग्रंथांबद्दल माहिती त्यांच्या पर्यंत पोहोचव्हायला हवी. कारण आपल्या भावी पिढी हि आपली संस्कृती जपणारी हवी. त्यासाठी आपण त्यांना आपल्या संस्कृतीची ओळख करून दिली पाहिजेच.
आमच्या एका बघिणीं डॉ. सौ.संगीता नंदकुमार शिरोडे यांनी एक कविता याच विषयाला अनुसरून लिहिली आणि खूप छान प्रकारे मांडलीय भगवान श्रीकृष्णला परत येण्याची विनवणी करणारे हे काव्य आपल्या साठी येथे त्यांची परवानगी घेऊन येथे लिहितोय
परत पुन्हा....
घ्यावा लागेल जन्म तुला आज परत कान्हा
प्रबोधन करण्याची वेळ आली आहे पुन्हा
गल्लोगल्ली कामासक्त दुर्योधन, दुःशासन
यावं लागेल तुला करण्या त्यांचं निर्दालन
द्रौपदीची राखावी लागेल आज पुन्हा लाज
कृष्णा तुला यावं लागेल परत पुन्हा आज||
अराजकता, अधर्माचं वाढलय पुन्हा स्तोम
अन्याय ,अत्याचाराचा वाढलाय खूप जोम
आसक्ती, मत्सर याचाच वाढलाय प्रभाव
निष्कामकर्म , वैराग्य याचाच आहे अभाव
ढोंगी कपटी लोकांची काढण्यास खरी लाज
कृष्णा तुला यावं लागेल परत पुन्हा आज||
सत्यासाठीच होती तुझीच सर्व चळवळ
स्वकियांविरूद्ध लढायचं दिल तूच बळ
गर्भगळीत अर्जुनाला दिली खूप हिंमत
जाणीव करून दिलीस कल्याणाची किंमत
मानवतेच्या धर्माचीच पुन्हा राखण्या लाज
कृष्णा तुला यावं लागेल परत पुन्हा आज||
(सोळाक्षरी )
धन्यवाद!!!